राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत ९ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

images-2.jpeg


विशेष प्रतिनिधी पुणे, दि. 3: पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत  आंबेगाव तालुक्यात मंचर गावचे हद्दीत चाकण रोडवरील पेट्रोल पंपासमोर चविष्ठ ढाब्याजवळ, भोरवाडी येथे  वाहनाची तपासणी केली असता वाहनातून परराज्यनिर्मीत असलेला भांग मिश्रीत पदार्थाच्या वाहनासह एकूण ९ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांनी दिली आहे.

याप्रकरणी प्रविण मगाराम चौधरी, देहुफाटा, चाकण ता. खेड यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा अधिनियम १९४९ अन्वये १ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयामध्ये महालक्ष्मी आयुर्वेदिक फार्मानिर्मीत स्पेशल बावा विजयावटी भांग मिश्रीत पदार्थाने तयार केलेल्या गोळयांच्या पाकीटांनी भरलेल्या सुमारे ५० किलो ग्रॅमच्या एकूण ५ गोण्या अंदाजे २५० किलो ग्रॅम वजानाचे भांग मिश्रीत पदार्थ,  एक पांढऱ्या रंगाचे मारुती सुझुकी कंपनीचे सीएनजी सुपर कॅरी मॉडेलचे चार चाकी वाहन क्रमांक व एक व्हिओ कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाईत निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक विराज माने व धिरज सस्ते, प्रताप कदम, सतिश पौंधे, शशिकांत भाट,रणजीत चव्हाण, अनिल थोरात, अमोल दळवी, राहुल तारळकर सहभाग घेतला.  अवैद्य दारू व्यवसाय करणाऱ्यावर अशाच प्रकारची कारवाई सूरू राहणार असून कोठेही अवैद्य दारू व्यवसाय सूरू असल्यास राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९११९८६ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!