विखरण चोरटक्की रिंगणगाव पाळधी मार्गे जळगावला बस गाड्या सोडण्याची मागणी…
एरंडोल:-जवळपास सहा वर्षांपासून विखरण ,चोरटक्की , रिंगणगाव या रस्त्याला अच्छे दिन आल्यामुळे एरंडोल येथून चार चाकी व दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात जळगावला या मार्गाने जाताना दिसून येतात एरंडोल येथून जळगावला जाण्यासाठी कमी अंतराचा रस्ता असल्यामुळे प्रवासी व नागरिक या मार्गाला पसंती देतात. इंधनाची व वेळ यांची बचत होत असल्यामुळे नागरिकांनी जळगावला जाण्यासाठी व जळगावहून परत येण्यासाठी या मार्गाला प्राधान्यक्रम दिलेला दिसून येतो. मात्र जनहिताय जन सुखाय या ब्रीद वाक्याला विसरलेले परिवहन महामंडळ गेल्या अनेक वर्षांपासून कमर्शियल झालेले आहे पण तोही दृष्टिकोन परिवहन महामंडळाला या रस्त्याबाबत दिसून येत नसल्याचे बोलले जाते.
एरंडोल येथून जळगावला जाण्यासाठी पिंपळकोठा वराड या राष्ट्रीय महामार्गाने जाण्याचा एकमेव मार्ग आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून जळगाव जाण्यासाठी विखरण चोरटक्की रिंगणगाव सावदे प्रचा पाळधी जळगाव हा पर्याय रस्ता निश्चित झालेला आहे. विशेष हे की एरंडोल येथून थेट जळगावला जाण्यासाठी या मार्गावरून एकही बस आजपर्यंत धावली नाही या मार्गाने दिवसातून किमान चार ते पाच वेळा बस सेवा सुरू केल्यास प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो तसेच रिंगणगाव परिसरातील नागरिकांना सध्या पाळधी मार्गे एरंडोल या तालुक्याच्या गावाला कामानिमित्त जावे लागते जर थेट बस सेवा सुरू झाली. रिंगणगाव सावदे प्रचा परिसरातील नागरिक पाळधी ऐवजी विखरण चोरटक्की रिंगणगाव मार्गे जाणे अत्यंत सोयीचे होणार आहे तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तालुक्याच्या गावाला शिक्षणासाठी जाण्याची सुद्धा सोय होणार आहे. दरम्यान लवकरच रिंगणगाव ग्रामपंचायत, सावदे प्रचा ग्रामपंचायत, पिंपळकोठा प्रचा ग्रामपंचायत,विखरण ग्रामपंचायत व परिसरातील इतर गावांच्या ग्रामपंचायत या प्रश्नावर एरंडोल बस आगाराकडे धाव घेणार आहेत.