मतदार यादी सदोष असल्यामुळे रवंजे बुद्रुक ग्रामपंचायतची निवडणूक रद्द करावी,
सरपंच पदाचे पराभूत उमेदवार ज्ञानेश्वर भगवान कोळी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार.
एरंडोल ( नितीन ठक्कर ) :- तालुक्यातील रवंजे बुद्रुक ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी असलेली मतदार यादीत सदोष असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक रद्द करावी अशी मागणी सरपंच पदाचे पराभूत उमेदवार ज्ञानेश्वर भगवान कोळी यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे. त्यामुळे गावात खळबळ माजली आहे.
मतदार यादीत अनेक मतदारांची नावे वार्ड नंबर एक मधील नावे, वार्ड नंबर दोन मध्ये समाविष्ट होती. तर वॉर्ड नंबर दोन मधील नावे वार्ड नंबर तीन मध्ये समाविष्ट होती, वार्ड नंबर तीन मधील नावे वार्ड नंबर एक मध्ये समाविष्ट होते अशा चुकीच्या पद्धतीने मतदार यादी प्रसिद्ध झालेली होती. त्याबाबत १८ ऑक्टोबर २०२२ रोजी कोळी यांनी तहसील कार्यालयाकडे तक्रार केली. मतदार यादीची अंशतः दुरुस्ती करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. अनेक मतदारांची नावे रद्द शेरा मारून त्यांना मतदारापासून वंचित ठेवण्यात आले. असा आरोप तक्रारी अर्जाद्वारे करण्यात आलेला आहे.
मतदार यादीत घोळ असल्यामुळे माझा सरपंच पदासाठी व माझ्या पॅनल मधील काही उमेदवारांचा सदस्य पदासाठी अल्पमतांनी पराभव झाला या सर्वस्वी सदोष मतदार यादी जबाबदार आहे तरी याबाबत सखोल चौकशी करून रवंजे बुद्रुक ग्रामपंचायतची झालेली निवडणूक रद्द करावी अशी मागणी ज्ञानेश्वर कोळी यांनी केले आहे.