चोरी करुन पळत होते चोर; घडलं असं काही !
नवी दिल्ली – चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. लोक दिवसा रात्री कोणत्याही वेळी चोरी करताना दिसून येतात. त्यामुळे चोरांची दहशत वाढली आहे.चोरांच्या भीतीने लोकांनी दुकान, घर सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये चोर स्कूटी चोरण्याचा प्रयत्न करत आहे मात्र पुढे घडतं भलतंच. समोर आलेल्या चोरीच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये, दोन चोर स्कूटी चोरण्यासाठी घरात घुसतात.
https://twitter.com/i/status/1652214615676444672
एकजण दुचाकीवर बसलेला दिसतो, तर दुसरा चोरी केलेली स्कूटी मागे ओढत असतो. चोरीची स्कूटी गेटबाहेर काढल्यानंतर ते पळून जाण्यापूर्वीच घराचा मालक बाहेर येतो. यामुळे त्या चोरांची भलती फजिती होते आणि त्यांना स्वतःची स्कूटीही तिथेच सोडून पळ काढावा लागतो. घराचा मालक चोरांचा सामना करतो.
एक चोर आपली स्कूटी उचलणारच होता की आजूबाजूचे बरेच लोक धावत येतात. चोरांना त्यांची आणि चोरीची दोन्ही गाड्या उचलता येत नाही. चोरट्यांना त्यांची स्कूटर घटनास्थळावर सोडून पळून जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही.