महिलेच्या पिशवीतून पळविले एक लाख रुपये……

images-5.jpeg

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील भातखेडे येथील हर हर महादेव महिला स्वयं सहाय्यता महिला समूह बचत गटाचे तीन लाख पंचवीस हजार रुपये घेऊन बचत गटाच्या पदाधिकारी महिला भातखेडे येथे परतत असताना एरंडोल बसस्थानकात दोन महिलांनी त्यांच्याजवळ असलेल्या तीन लाख पंचवीस हजार रुपयातून एक लाख रुपये पळविल्याची घटना घडली असून एका इसमाचे दुचाकीच्या डिक्की मधून एक लाख वीस हजार रुपये अज्ञात इसमाने पळविल्याची घटना घडली असून एरंडोल पोलीस स्टेशनला त्याबाबत करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी भातखेडे येथील हर हर महादेव महिला स्वयं सहाय्यता महिला समूह बचत गटाच्या यशोदा अशोक पाटील व सचिव कोकिळा पुंडलिक पाटील यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया एरंडोल येथील शाखेतून सकाळी १० वा. बचत गटाचे तीन लाख पंचवीस हजार रुपये घेऊन दुपारी १२ वाजेच्या सुमारास एरंडोल बस स्थानकावर आल्या व भातखेडे येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना असताना त्यांच्या पैसे असलेल्या पिशवीतून कोणीतरी पिशवीची चैन ओढत असल्याचे त्यांना संशय आल्याने त्यांनी मागे वळून पाहिल्यावर त्यांना एक महिला पिशवीतून पैसे काढत असल्याचे समजले त्यावेळी त्यांनी त्या महिलेस पकडून आरडा ओरड केल्याने त्या ठिकाणी असलेले प्रवासी व शाळकरी मुले यांनी दोन महिलांना चोरी करताना रंगेहात पकडले तसेच त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे संगीता प्रभू मानकर व वजाबाई महादेव उबाळे रा. रामेश्वरी टोळी नागपूर असे सांगितले. व संगीता मानकर या महिलेकडे एक लाख रुपये मिळून आले.
तसेच दुसऱ्या घटनेत एरंडोल येथील कोर्टासमोरील एकवीरा हॉटेल जवळ राजेंद्र रामचंद्र पाटील रा. पिंप्री सिम यांनी आपल्या मोटरसायकलच्या डिक्कीत एक लाख वीस हजार रुपये ठेवले होते व ते मोटरसायकल पासून सात ते आठ फूट अंतरावर उभे राहिले या क्षणी एका अनोळखी इसमाने आहे त्यांच्या मोटर सायकलच्या डिक्कीतून एक लाख वीस हजार रुपये काढले सदर इसमाचा राजेंद्र पाटील यांनी पाठलाग केला असता तो मोटरसायकलवरील एका इसमा सोबत पारोळ्याकडे पळून गेला असल्याची तक्रार एरंडोल पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
एरंडोल पोलीस स्टेशनला दोघी चोरीच्या घटनेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चौधरी योगेश महाजन हे करीत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!