१६ ऑगस्ट रोजी एरंडोल बंदची हाक…
प्रतिनिधी – एरंडोल येथील सकल हिंदू समाज यांच्यातर्फे बांगलादेशात होत असलेल्या हिंदू वरील अत्याचार हिंसाचाराच्या निषेधार्थ संपूर्ण एरंडोल शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तसे निवेदन संबंधित कार्यालय तथा व्यापारी असोसिएशन यांना देण्यात आलेली आहे.
निवेदनात काही दिवसापासून बांगलादेशात मोठ्या प्रमाणात जिहादी धर्मियांकडून तसेच धार्मिक हिंसाचार उफाळून आल्याने धार्मिकतेच्या आधारावर तेथील हिंदूंना लक्ष करून त्यांच्यावर अतोनात असे अत्याचार सुरू असल्याचे म्हटले असून यात हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड , हिंदू देवतांची विटंबना तसेच पुजाऱ्याचा निघृण खून महिलावर भयंकर अत्याचार असे सर्व घडत असल्याचे म्हटले आहे. सदर घटनेत हिंसाचार जिहादच्या नावाखाली होत असल्याचे म्हटले असून सदर कृत्य अतिशय घाणेरड्या स्वरूपाचे असून या प्रकारामुळे संपूर्ण हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या असून त्याचा निषेध म्हणून १६ ऑगस्ट रोजी संपूर्ण एरंडोल बंदची हाक देण्यात आली आहे.