बापरे! बाप, भाऊ आणि मुलाने रचला कट, शेतात नेलं आणि…
प्रतिनिधी जालना – जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. घरात सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून वडील, भाऊ आणि मुलांनी संगनमत करून शेतात घेऊन जात हातपाय बांधून मुलाचा खून केला.ही घटना अंबड तालुक्यातील शिरनेर गावातील शिवारात घडली आहे. धक्कादायक म्हणजे या सर्वांना मृतदेह परस्पर जाळून टाकला होता. काय आहे प्रकरण? धर्मराज वैद्य असं खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून धर्मराज हा दारूचा नशेत घरात नेहमी वाद घालत असायचा. या नेहमीच्याच वाद घालण्याला घरातील वडील, भाऊ आणि मुलगा त्रासले होते.
दरम्यान १५ मे रोजी सोमवारी एका खबऱ्यामार्फत पोलिसांना आरोपी नारायण चिमाजी वैद्य हे मुलगा कर्णराज नारायण वैद्य व नातू निर्गुन धर्मराज वैद्य हे कुणाला काही न सांगता धर्मराज वैद्य याचा अंत्यविधी उरकवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कशी झाली भांडाफोड? माहितीवरून पोलिसांनी अंत्यविधी झालेल्या ठिकाणी जाऊन पंचनामा करत तपासाची चक्र फिरवली. धर्मराज वैद्य हा नेहमी घरी वाद करुन त्रास देत असल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळुन मयताचे वडिल, भाऊ आणि मुलगा या तिघांनी मिळून धर्मराजला शेतात नेऊन काठीने हातापायांवर मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.सदरची बाब कोणाच्याही लक्षात येऊ नये; म्हणून सर्वांनी संगणमत करून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने कुठलाही अंत्यविधी पुर्वीचा विधी न करता मयत धर्मराज याचा मृतदेह जाळुन पुरावा नष्ट केल्याचे तपासात उघड झाले. यानंतर आरोपींनी कबुली जबाब दिल्यामुळे पोलिसांनी आरोपी नारायण चिमाजी वैद्य, कर्णराज नारायण वैद्य, निर्गुन धर्मराज वैद्य यांच्या विरोधात संगणमत करून खून केला प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास अंबड पोलीस करत आहे