Viral Video: झाडावरुन बिबट्या माकडाचा पाठलाग करताना..

n5196452901689703020280301a3a33517a4c806d552c4fdd73225a3aae2a4228c595b3c5ac56c0cd471a4d.jpg

विविध प्रकारच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ प्राण्यांशी संबंधित असतात. अस्वलाच्या बचावाची क्लिप असो, घरात घुसलेला साप असो किंवा इतर प्राण्यांची शिकार करणाऱ्या वन्यजीवांच्या क्लिप असो, अशा अनेक व्हिडिओंनी आतापर्यंत नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलेलं आहे.

या क्लिपमध्ये बिबट्या माकडाच्या मागे धावताना दिसत आहे. तो झाडावर चढतो आणि मागे उडी मारून माकडाला पकडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर त्याला पकडता न आल्याने बिबट्या पुन्हा प्रयत्न करतो. यावेळी बिबट्याने झाडावरून झेप घेतल्यावर माकडाला पकडण्यात यश आले. पोस्टच्या कॅप्शनमध्ये, IFS सुसंता नंदा यांनी लिहिले की, “हेच कारण आहे की बिबट्याला सर्वात संधीसाधू आणि बहुमुखी शिकारी म्हणून ओळखले जाते.”

About Author

You may have missed

error: Content is protected !!